HW News Marathi
महाराष्ट्र

युती करायची नसेल तर हरकत नाही | सुधीर मुनगंटीवार

मुंबई | शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती व्हावी अशी भाजपची इच्छा आहे परंतु शिवसेनेला युती करायची नसेल तर आमची काही हरकत नाही. असे नमूद करत भाजप निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाईल असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी व्यक्त केला.

नागपूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ सुधीर मुनगंटीवार यांनी मागितली होती. ठाकरे परदेशी गेल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातली भेट बारगळली.

केंद्रीय पातळीवर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत करार झाला याला शिवसेनेचा विरोध आहे. कडेगावमधील शिवसैनिकांच्या हत्येवरून उद्धव ठाकरे नाराज असल्याने भेटीची वेळ पुढे ढकलल्याचे समजते. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असे विधान केले आहे. या पाश्र्वभूमीवर मुनगंटीवार यांच्याकडे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता आम्ही युती करणारे आहोत. युती तोडणारे नाही असेही ते यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

सध्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत युती तोडून पुन्हा लोकांच्या अपेक्षांचा भंग करणार नाही. याच भावनेने युती करण्याचा भाजपचा विचार आहे. परंतु एकाच्या इच्छेने युती होत नसते. शिवसेनेची इच्छा नसेल तर हरकत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार

News Desk

विनायक मेटे अनंतात विलीन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

Aprna
राजकारण

बेटी पढाओ भाजपा से बचाओ | सुधांशु भट्ट

News Desk

मुंबई |उन्नाव बलात्कार प्रकरण तसेच कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजपचे नेते कार्यकर्ते सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी रात्री मुंबईचे प्रदेश कॉंग्रेस नेते सुधांशु भट्ट यांनी भाजपाच्या मुख्यालयासमोर बेटी पढाओ भाजपा से बचाओ अशा आशयाचे बॅंनर लावत उन्नाव आणि कठुआ प्रकरणाचा अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला.

फलक घेऊन कॅंडल मार्च काढून निषेध व्यक्त न करता सरळ कार्यालया समोर बॅंनर लावून निषेध व्यक्त केल्यामुळे सुधांशु भट्ट राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. कॉंग्रेसने देशभर केलेल्या कठुआ प्रकरणातील आंदोलनामध्ये सुधांशु भट्ट यांचे हे बॅनर लावून निषेध आंदोलन मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. बलात्कार प्रकरणी भाजपवर होत असलेली टिका या बॅनरमुळे जास्तच स्पष्ट झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Related posts

प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा न्यायालयाचा दणका

News Desk

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

News Desk

#LokSabhaElections2019 : पंतप्रधानांनी भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी !

News Desk