HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! खासदार नवनीत राणांचेही अमित शहांना पत्र

मुंबई । महाराष्ट्रातील मुख्य विरोधीपक्ष असलेला भाजप सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यातच, भाजप नेते नारायण राणे यांच्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 8 मार्च रोजी नवनीत राणा यांनी अमित शहा यांना हे पत्र लिहिले आहे. यापूर्वी, नारायण राणे यांनीही अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे हीच मागणी केली आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या या पत्रात मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि त्या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांची NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशीही मागणी नवनीत राणा यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे, महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।

नवनीत राणा यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात,

“अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकारणी मनसुख हिरेन यांची चौकशी करण्यात आली होती. हिरेन चौकशीला सहकार्यही करत होते. मात्र, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. हिरने यांनी याबाबत ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला”, ही सर्व माहिती देखील दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजय वडेट्टीवारांच्या साधूंबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, पक्षाचा लवकरच सफाया होईल असा भाजपचा इशारा

News Desk

पडळकरांच्या जीवाला काही झाले तर…!; पत्राद्वारे फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

News Desk

काँग्रेस पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नाही, नितेश राणेंचा आरोप

News Desk