HW News Marathi
Covid-19

देशात नवे कोरोना रुग्ण ६० हजारांच्या घरात, कोरोनाबळींच्या संख्येतही झाली घट

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात ६० हजार ४७१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ७२६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. कालच्या दिवसात देशात१ 1 लाख १७ हजार ५२५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यातील कोरोनास्थिती सध्या दिलासादायक आहे. कारण, दैनंदिन वाढणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी कि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ०८ हजार १२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच एका दिवसात २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच याच गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील उपचार घेणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ४७ हजार ३५४ इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज २५५३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर मुंबईने ५० हजारांचा टप्पा ओलांडला

News Desk

पुण्याचे माजी महापौरही भोंगळ कारभाराचे बळी, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही करावी लागली वणवण

News Desk

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढव, अजित पवारांचे आदेश

News Desk