मुंबई। महाराष्ट्रातल्या काही भागात मुस्लिम मोर्चांमुळे आता हिंसक वळण लागलं आणि नांदेड, अमरावती, मालेगाव या शहरांमध्ये स्थिती तणावपूर्ण झाली. मात्र यानिमित्ताने राजकीय नेत्यांचे देखील व्हिडीओ प्रतिक्रिया समोर येऊ लागलेत. काही व्हिडीओ जमावानं कशी तोडफोड केली याचे आहेत तर काही नेत्यांच्या भाषणाची आहेत. यातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं भाषण आहे ते जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांचं. त्यांच्या याच भाषणाने जमाव भडकला की काय असा सवाल आता सोशल मीडियावर केला जातोय. विरोधी नेतेही अर्जुन खोतकरांच्या भाषणावर बोट ठेवतायत. त्यांचं हेच भाषण आता भाजप आमदार नितेश राणेंनी रिट्विट केलं आहे.
खोतकर नेमकं काय म्हणाले?
रजा अकादमीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या धरणे आंदोलनात शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी केंद्रातील सरकारवर फटकेबाजी केली. ते म्हणाले ‘जिथं कुराण जाळलं जाईल, जिथं मशिद तोडली जाईल, जिथं भगवद गीता तोडली जाईल,आपण सर्व जण एकत्र येऊन, ह्या धरतीमातेचे सुपूत्र म्हणून याविरोधात लढू. ह्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद, इन्शा अल्लाह जे काही होईल आम्ही तुमच्यासोबत आहोत. असं वक्तव्य आता अर्जुन खोतकर यांनी केलं आहे.
Did Shiv Sena ex-minister @miarjunkhotkar actively provoke violence Muzlim mob during anti #Tripura rally?
If yes then is this new version of #Hindutva?
Will he clarify about this video? @mieknathshinde @NiteshNRane @Dev_Fadnavis @GopichandP_MLC @KiritSomaiya @priyankac19 + pic.twitter.com/PJ6nP9gQYC— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) November 13, 2021
त्रिपुरात जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्या निषेधार्थ काल ठिकठिकाणी मुस्लिम मोर्चे निघाले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला.याच मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी भाजपवर टीका केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.