पुणे | माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एल्गार परिषदेतील अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९०दिवसांची वाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला आज सत्र न्यायाधीश के.डी. वडणे यांनी मंजूर केला आहे. आरोप पत्र दाखल न झाल्यास संशयितांना जामीन मिळू शकतो. त्यामुळे हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळावी, यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
Pune Sessions Court has granted a 90 day extension to Pune Police to file chargesheet in a case registered against five accused Surendra Gadling, Shoma Sen, Mahesh Raut, Sudhir Dhawale and Rona Wilson. #BhimaKoregaon
— ANI (@ANI) September 2, 2018
तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातून तर रोना विल्सन यांना दिल्लीतून आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपूर मधून भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी अटक केली होती. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या पाच संशयितांना देखील अटक करण्यात आली. त्यामुळे आधी आणि नुकतेच अटक करण्यात आलेल्या या एकूण आठ संशयितांचा कसून तपास करण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
बंदी घातलेल्या सीपीआय या संघटनेचे हे पाचही संशयित सक्रीय सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे. या संशयितांकडून कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, सीडी, डीव्हीडी, हार्ड डिक्स, सिम कार्ड अशा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करून त्या तपासासाठी मुंबई फॉरेंसिक लॅबकडे पाठविण्यात आल्या आहेत. या संशयितांनी विद्यार्थ्यांना नक्षली भागात नेऊन प्रशिक्षण दिल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सचादेखील तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या
भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक
Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींना नजरकैद
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.