HW News Marathi
महाराष्ट्र

पाथरूड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा ऊसतोड मजूरांवर हल्ला; 4 मजूर जखमी

उस्मानाबाद | उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील बागलवाडी तलाव परिसरात शुक्रवार, दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राण्याने ऊसतोड करणाऱ्या मजुरांवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की सध्या उन्हाळ्यातील एप्रिल महिना सुरू असल्याने उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे, त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात सैरभैर फिरत आहेत. अनेक वन्य प्राणी हे तलाव परिसरात व मानवी वस्तीकडे पाहायला मिळतात.

भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील बागलवाडी तलाव परिसरात जालिंदर खुणे यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू होती. शुक्रवार, 29 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी करत असलेल्या चार मजुरांवर बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने जोरदार हल्ला केला. यामध्ये तीन पुरुष व एक महिला उसतोड मजुरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामध्ये ज्योतीराम पंडित पावले (वय 27 वर्ष), समाबाई बापू सपकाळ (वय 44), शिवाजी मीटू सपकाळ (वय 27) आणि अशोक भिमराव काटे (वय 32) अशी जखमींची नावे आहेत. सदरील सर्व ऊसतोड मजूर ईराचीवाडी तालुका भूम येथील आहेत.

तर या हल्ल्यात ऊसतोड मजुरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी पाथरुड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बिबट्या सदृश वन्यप्राण्याला पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा तात्काळ तयार करण्याबाबत तहसील कार्यालयाच्या वतीने वन अधिकारी यांना तात्काळ कळविण्यात आले असून वनविभागाच्या वतीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तर सदरील घटनेने पाथरूड परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

“पाथरूड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने ऊसतोड करणाऱ्या चार कामगारांवरती हल्ला केला आहे. जखमी झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. तसेच बिबट्या सदृश्य प्राण्याला पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा तात्काळ तयार करण्याबाबत वनाधिकारी भूम यांना तात्काळ कळविण्यात आले असून यंत्रणा कार्यान्वित झाली आहे”. – प्रमोद सावंत, नायब तहसीलदार भूम

बिबट्या सदृश्य हल्ल्यात जखमी झालेले मजूर काय म्हणतात :-


“पाथरूड येथील जालिंदर खुणे यांचा ऊस तोडणी सुरू असताना अचानक उसाच्या फडातून बिबट्याने अंगावर झडप घेऊन माझ्यासह इतर तिघांवर हल्ला केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमा शरीरावर झाल्या आहेत. मी स्वतः बघितल्याने तो बिबट्याच आहे.” , असं शिवाजी सपकाळ (ईराचीवाडी ता.भूम) यांनी सांगितले.

“ऊस तोडणी सुरू असताना अचानक उसाच्या फडातून बिबट्याने झडप घातल्याने थेट आमच्यावर हल्ला चढविला आम्ही प्रचंड घाबरलो, थोडा आरडाओरड केल्यानंतर बिबट्या हल्ला करून पसार झाला”, असं  ज्योतीराम पावले (ईराचीवाडी ता. भूम) यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंचनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यातील कृषी विकास दर १२ टक्के – मुख्यमंत्री फडणवीस

News Desk

‘डॉ.कोल्हेंनी देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण करु नका’, थेट पंतप्रधान मोदींना केली विनंती…!

News Desk

नव्या पेन्शन योजनेविरोधात ठाणे ते मुंबई निघणार पेन्शन दिंडी

News Desk