HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा ! राष्ट्रवादीचा काँग्रेसला सल्ला

मुंबई | महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थिर चालण्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर टिका करणं टाळावं असा थेट इशारा काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांना दिल्यानंतर राष्ट्रवादीने त्याला उत्तर दिले आहे. शरद पवारांनी दिलेल्या व्यक्तव्याकडे एक वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावं असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी यांच्या भाष्य केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं,” असं सूचक ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी दिलेल्या व्यक्तव्याकडे एक वडिलकीचा संदेश म्हणून पाहावे. त्यात काही राजकारण नाही. महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षाच्या विचाराचं भक्कम सरकार आहे. बराक ओबामांनी लिहीलेल्या पुस्तकात त्यांनी राजकारणातील नेत्यांवर काही व्यक्तव्य केलं आणि यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला त्यामुळे हा काही राग नाही एक वडिलकीच्या नात्याने संदेश आहे त्याकडे तसं बघावं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरीत आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

Manasi Devkar

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवामान खात्याचे केले कौतुक

News Desk

पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात, १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

News Desk