HW News Marathi
महाराष्ट्र

उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

भंडारा | उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात वाघाचा बछडा चार्जरचा रविवारी(३० डिसेंबर) सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत आढळला. नर जातीच्या या बछड्याचे पोट फुगलेले असल्याने विषबाधा असण्याची शक्यता वर्तविण्यात प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे.

चार्जर असे बछडाचे नाव असून हा बछडा प्रसिद्ध जय वाघाचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. उमरेड- पवनी- करांडला अभयारण्यात रविवारी जंगल सफारीसाठी काही पर्यटक गेले होते. चिचगाव जंगलातील कंपार्टमेंट क्र. २२६ मध्ये त्यांना वाघ मृतावस्थेत दिसून आला. या प्रकाराची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रचंड गोपनियता बाळगली जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विश्वास नांगरे पाटलांना माहिती लपवून ठेवली म्हणून निलंबित करा! – प्रकाश आंबेडकर

Aprna

“आता अमित शाहांना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?”

News Desk

‘मुका’ घेण्याचं वक्तव्य महागात, रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार!

News Desk
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटीकडून मोफत पास

News Desk

मुंबई | यंदा महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या दुष्काळाच्या झळा राज्यातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहे. ही परीस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील जवळपास ७६ तालुक्यातील महसुली मंडळातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून एसटीचा सवलत पास मोफत देण्यात येणार आहे. यांसंदर्भातील घोषणा राज्य परिवन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शनिवारी(२९ डिसेंबर) केली. पुर्वी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली आहे. आता महसुली मंडळातील विद्यार्थ्यांना १ जानेवारी २०१९ पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अत्यंत कमी झालेल्या पावसीमुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे अनेक अडचणींचा सामना करीत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदातेच आहेत .सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीतल लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा,महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पासमध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी १०० टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. राज्यातील साधारण ४२ लाख ३ हजार विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा सध्या लाभ मिळणार आहे.

Related posts

विनाकारण बाहेर निघाल तर निघेल गाढवावरून धिंड, गावकर्‍यांनी घेतला एकमुखाने निर्णय

swarit

पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा – छत्रपती संभाजीराजे

News Desk

जबाबदारी पार पाडण्याची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करता? राष्ट्रवादीचा मोदींना सवाल

News Desk