नवी दिल्ली | दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थ्यांवरील जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद दिल्लीसह देशभरात पडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे बोलविण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा हल्ला २६/११च्या हल्लाची आठवण करून देतो,” अशा शब्दात जेएनयूच्या हल्ल्याचा निषेध नोंदिवला.
#WATCH Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on JNU violence: What was the need for attackers to wear masks? They were cowards. I was watching on TV and it reminded me of the 26/11 Mumbai terror attack. I will not tolerate such attacks in Maharashtra pic.twitter.com/LR1kpctk8K
— ANI (@ANI) January 6, 2020
“जेएनयूमध्ये हल्ला करणारे बुरखाधारी डरपोक होते. त्यांच्यात समोर येण्याचे धाडस नाही. ते जे कोण आहेत त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. जे झाले ते टीव्हीवर पाहून मला २६/११ ची आठवण झाली आणि मी हे देशात घडू देणार नाही. पोलिसांनी इथे जर केवळ बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नसेल,” असा आरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे.
"माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांची निपक्षपातीपणाने चौकशी होऊ द्या आणि हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे."
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/FUJFdocfmp— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 6, 2020
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “माझे म्हणणे एवढेच आहे की सगळ्यांची निपक्षपातीपणाने चौकशी होऊ द्या आणि हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे.” “महाराष्ट्रामध्ये असले प्रकार कदापी सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व युवकांना मी हेच सांगेन की दुसरीकडे जे काही घडते ते अयोग्य आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काळजी करण्याचं कारण नाही.आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहात,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये असले प्रकार कदापी सहन केले जाणार नाही.महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व युवकांना मी हेच सांगेन की दुसरीकडे जे काही घडतं ते अयोग्य आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काळजी करण्याचं कारण नाही.आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहात.
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/oszmKrfXAC— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.