HW News Marathi
महाराष्ट्र

महिला व बालकांवरील अत्याचाराविरोधात राज्य सरकारकडून ‘शक्ती’ विधेयकाला मान्यता !

मुंबई । राज्यातील महिला अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने ‘शक्ती’ कायदा अंमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर व सक्तीची कारवाई करण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आज (९ डिसेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘शक्ती’ विधेयकावर एकमत झाल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

शक्ती कायद्यासाठी आय.पी.सी. कलम, पोस्को कलम, तसेच सी.आर.पी.सी. कलमात बदल करून नवीन कायदा तयार करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यानुसार एखाद्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचे पुरावे मिळाल्यास आरोपीस याआधी जन्मठेपेची शिक्षा होती. मात्र ‘शक्ती’ विधेयकानुसार आता मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे प्रस्तावित केले आहे, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच तीस दिवसात गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, अशी या कायद्याची रूपरेषा असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव विधिमंडळात सर्व पक्षीय आमदारांसमोर ठेवण्यात येईल. विधिमंडळात त्याला मंजूरी मिळाल्यास पुढे केंद्र शासनाकडे व राष्ट्रपतींकडे हे विधेयक मंजुरीस जाईल आणि ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर हा कायदा अमलात आणला जाईल, असेही यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची बार्टीच्या विद्यार्थ्यांप्रति दिसली उदासीनता! – प्रीतम मुंडे

Aprna

अखेर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख केला दुरुस्त!

News Desk

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री? मोदी, शहा जोडी कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब!

News Desk