HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण याच आठवडयात राजीनामा देतील !

सोलापूर | “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांची नावे आताच जाहीर करण्यात मजा नाही, असे म्हणत भाजप नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आमदारांची नावे अद्याप गुप्त ठेवली आहेत. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर देखील सडकून टीका केली आहे. “लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचलेला असताना कनिष्ठांनी काम कसे करायचे ?”, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचला आहे. म्हणूनच त्यांनी राजीनामे दिले आहेत. आपल्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचलेला असताना कनिष्ठांनी काम कसे करायचे ?, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीची तुलना १९८४ सालच्या भाजपच्या स्थितीशी केली आहे. “१९८४ साली भाजपच्याही केवळ २ जागा निवडून आल्या होत्या. मात्र, आम्ही हातपाय गाळून न बसता पक्ष वाढवला. त्यामुळेच आता आमचे ३०३ खासदार निवडणूक आले”, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलसोबत आता घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढ

Aprna

ठाण्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालून दोघांचे प्राण वाचवण्यात यश

News Desk

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये जशी फूट पडली तशी महाराष्ट्रात मोठी फूट पाहायला मिळेल – सदाभाऊ खोत

News Desk