HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी कायदेशीरबाबी पूर्ण कराव्या लागतील | मुख्यमंत्री

मुंबई | मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांनी मुंबईतील राजाराम महाराजांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याच्या ते वेळी बोलत होते. काही जण असे वाटते की, अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, परंतु केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात ते निघून गेले. कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण हे आमचे सरकार देणार असल्याचे फडणवीस यावेळी बोलत होते. मागासवर्ग आयोगाला आम्ही लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असल्याचेही फडणवीस म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गृह विभागाकधून सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचे आदेश

Aprna

कोविडमुळे संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? सचिन सावंत

News Desk

अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा झिरवळांना सवाल

News Desk
मुंबई

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

News Desk

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे २०१९ साली म्हणजेच आगामी लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले रिंगणात उतरणार आहेत. याबाबत वांद्रे पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा रामदास आठवलेंनी घेतला.

या मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेशही आठवलेंनी दिले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यात महामेळावाचे आयोजिन करण्यात आले आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रामदास आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रिपाइंचे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले २००९ मध्ये पराभूत झाले होते. मात्र १९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्तीनगर, धारावी, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानले जातात. या भागात आठवलेंच्या रिपाइंची संघटनात्मक बांधणीही आहे.

Related posts

खड्डे नसलेला रस्ता दाखवा, मंत्र्याला बक्षिस

News Desk

तुकाराम मुंढेची बदली, मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

News Desk

…आता पुढील स्थानक प्रभादेवी

News Desk