HW News Marathi
Covid-19

विनोदी अभिनेता भूषण कडूवर दु:खाचा डोंगर तोसळला, पत्नीचा कोरोनामुळे झाला मृत्यू

मुंबई | गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडपासून मराठी सिनेसृष्टी आणि कलाक्षेत्रात अनेकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे. विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कांदबरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दूर्दैवाने २९ मेला कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण आणि कादंबरी यांना प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. भूषण आणि त्याच्या संपूर्ण कुंटबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. भूषणत्या पत्नीच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.

विनोदवीर भूषणच्या कुटुंबावर शोककळा

अभिनेता भूषण कडूने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ यासोबतच ‘कॉमेडीती बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा शोसोबतच भुषणने अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मस्त चाललंय आमचं, , श्यामची मम्मी, भुताची शाळा, टारगेट अशा विविध कालकृतींमधून भूषणने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. मात्र आज भूषणच्या संपूर्ण कुटुंबावर त्याच्या पत्नीच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही !

News Desk

चिंता कायम ! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजारांच्या पार

News Desk

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरकरिता पाळावेच लागणार ‘हे’ नियम

News Desk