HW News Marathi
महाराष्ट्र

मराठीतील दिग्गज कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश 

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे.

या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

‘रेल्वे कर्मचारी आता रात्री १२ वाजेपर्यंत काम करणार, रेल्वेत दोन शिफ्ट’, रेल्वे मंत्री वैष्णव यांची घोषणा

News Desk