सांगली । कोरोनाने सगळ्यांनाच घाम फोडला मात्र इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना आजीने कोरोनाला आपल्या जवळपास फिरकू दिले नाहीच उलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने जगण्याशी लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे.दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज (७ जून) या १०८ वर्षीय जरीना आजींचा साडीचोळी देऊन सत्कारही केला.
आमच्या इस्लामपूर शहरातील १०८ वर्षीय जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे. pic.twitter.com/DnUxWgxcS8
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2021
“इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे दाखवून दिले आहे. त्यामुळे लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे”, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.