HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही फक्त ‘घाबरत नाही’ सांगा, मग आम्ही उद्यापासून…!; आता मलिकांचा शेलारांना मोठा इशारा

मुंबई । ठाकरे सरकार आज आपला २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना दुसरीकडे भाजप मात्र अत्यंत आक्रमक झाला आहे. ह्याच पार्श्वभूमीवर सध्या भाजप नेते पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारबाबत आपला संताप व्यक्त करत आहे. तर आता महाविकास आघाडीकडूनही प्रत्युत्तरं यायला सुरुवात झाली आहे. आज (२८ नोव्हेंबर) नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते आशिष शेलारांनी सरकारवर तोंडसुख घेतलं. त्यानंतर आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पलटवारासाठी पुढे सरसावले आहेत.

आशिष शेलारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, तुम्ही पब, पेग आणि पार्टीत सरकार मग्न म्हणता? आता उगाच उद्यापासून खरं पार्टीत कोण असतं, पबला कोण असतं हे आम्हाला काढायला लावू नका. आमच्याकडे सगळी माहिती आहे. आशिष शेलरांनी फक्त एवढंच सांगावं की आम्ही कुणाला घाबरत नाही”, असं म्हणत मलिक यांनी आशिष शेलरांना मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता ह्यावर शेलारांचं प्रत्युत्तर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं.

सरकार पडेल असं बोलून बोलून भाजप थकलं!

“गेली दोन वर्षे सरकार पडेल असं बोलून बोलून भाजप थकलं. त्यांच्याकडे आत्ता बोलायला काही नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कोणाला सरकार बनवता येत नाही. भाजपला हे कळायला हवं होतं. आमचा ठाम विश्वास आहे की आमचं हे सरकार चालेल, आणि काहीही झालं तरी पडणार नाही”, असा दावाही यावेळी नवाब मलिक यांनी केला असून सरकार पाडण्याच्या भाजपच्या नेत्यांच्या विधानांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्य सरकारचं काम केंद्रापेक्षाही चांगलं!

आपल्या पत्रकार परिषदेत पुढे नवाब मलिक म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांत अनेक समस्यांना तोंड देत सरकार इथपर्यंत पोहोचलं. कोरोनामध्ये राज्य सरकारने केंद्रापेक्षाही चांगलं काम केलं. तिथे मृतदेह नदीत वाहत होते. मात्र, आम्ही इथे रुग्णांना वाऱ्यावर सोडलं नाही.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Aprna

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय! अजित पवारांचा फडणवीसांना दणका

News Desk

नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडीला अपघात!

News Desk