HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर वांद्रे न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्न खासदार नवनीत राणा यांना ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसावरून झालेल्या नाट्यानंतर त्यांना खार पोलिसांनी अटक केली. यानंतर राणा दाम्पत्यांना आज (२४ एप्रिल) वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असून राणा दाम्पत्यांची बाजू अॅड. रिझवान मर्चंड हे बाजून मांडणार आहे. तर अॅड प्रदीप घरत हे सरकारची बाजू मांडणार आहे. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. राणा दाम्पत्यांना जामीन मिळणार की कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

शिवसेनेच्या तक्रारीनंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आता राणा दाम्पत्यांची काल (२३ एप्रिल) रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खार पोलीस स्टेशनमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांना १५३ अ कलमा अंतर्गत पोलिसांनी अटक केले आहे. या कलमानुसार, राणा दाम्पत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली, धर्म, वंश, समाजाची शांतता भंग करणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणे, या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कारणामुळे राणा दाम्पत्यांनी घेतली माघार

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, आज पत्रकार परिषद घेऊन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, आणि राज्यातील जनता आणि पोलिसांना त्रास होऊन नये म्हणून हनुमान चालिसा पठाण करण्याचे आंदोलन आम्ही थांबवित आहोत, अशी मागणी राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात सत्तांतर घडेल,उद्धव ठाकरेचं सरकार जाऊन भाजप सरकार येईल -रामदास आठवले

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; ‘या’ कलमा अंतर्गत होणार कारवाई

Aprna

कुणाला किती मुलं होती,कुणाचं लग्न झालं होतं,सांगू का ? मुंडे प्रकरणावरून अजित पवारांचा विरोधकांना इशारा !

News Desk