HW News Marathi
Covid-19

राज्यात आज 63 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा ६५ हजारांच्या पार गेला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 67 हजार 160 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिलासादायक बाब अशी की याच एका दिवसात नवीन 63 हजार 818 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 6 लाख 94 हजार 480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02% झाले आहे.

१८ वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढवा बैठक घेतली. यात महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय. तसेच महाराष्ट्रातील १८ वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहे. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पालिकेने तयार केला डॅशबोर्ड

News Desk

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

#RathYatra : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk