HW News Marathi
Covid-19

राज्यात सद्यस्थितीत एकूण ८५ हजार १४४ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (४ फेब्रुवारी) राज्यात तब्बल ८ हजार ९९८ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात नव्या ६ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ४९ हजार ४८४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ८५ हजार १४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.६६% झाले आहे. दरम्यान, नागरिकांना कोरोनाविषयक सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत २२,२५२ नवे रुग्ण, जगाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर

News Desk

फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र, म्हणाले…”ये पब्लिक है, सब जानती है!”

News Desk

लॉकडाऊन नको या मोदींच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात उध्दव ठाकरे लॉकडाऊन आज लावणार?

News Desk