HW News Marathi
महाराष्ट्र

भांड्याला भांड लागणारच, आम्ही समन्वयातून मार्ग काढू ! राऊतांच्या संतापानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खेड पंचायत समितीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दात राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या कडक पवित्र्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “स्थानिक राजकारणात ३ पक्ष असल्याने भांड्याला भांड लागणारच. पण आम्ही समन्वयातून मार्ग काढू”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “संजय राऊत काय बोलले हे आपल्याला माहित नाही. परंतु, स्थानिक पातळीवर काही वाद झाला असेल तर समन्वयातून मार्ग काढू. कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडे लागतेच”, असे म्हणत जयंत पाटील यांनी हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर, संजय राऊतांनी इशारा देत राष्ट्रवादीवर आगपाखड केली आहे. “पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटलांकडे लक्ष द्यावे. अन्यथा हा विषय सोडवायला शिवसेना समर्थ आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

खेड प्रकरणानंतर संतापलेले संजय राऊत म्हणाले की, “सरकारमधील पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र, खेडमध्ये वारंवार या घटना घडत आहेत. तीन पक्ष एकत्र असल्याने भांड्याला भांडे लागणारच. पण हा अलिखित करार आहे की एकमेकांची माणसे फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश 

News Desk

ST कर्मचारी आक्रमक! शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक आंदोलन

Aprna