HW News Marathi
महाराष्ट्र

शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर

सातारा | साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पॅनेल उभं करण्यात आलं असून दीपक पवार या निवडणुकीचं नेतृत्व करतील असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादीकडून शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर देण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत आल्यास नगरपालिका निवडणुकीचं नेतृत्व शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देऊ असं जाहीर केलं आहे. नेतृत्व कोण करणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी, “शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर ते करतील. नाही आले तर मी आणि दीपक पवार करु”, असं उत्तर दिलं. शशिकांत शिंदेंच्या या ऑफरवर शिवेंद्रराजे भोसले या काय उत्तर देतात हे मात्र आता पहावं लागणार आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांची धमकी

शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिलेली आहे. “माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,” अशा शब्दांत शिवेंद्रराजे भोसले यांनी आव्हान दिलं आहे. साताऱ्यातील जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवेंद्रराजेंनी नेमकं काय म्हटलं होतं?

“माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे.”

शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे ही ऑफर स्वीकारणार की नाहीं हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

News Desk

राज्यातील घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंताजनक, राज्यपालांनी त्यांना बोलतं करावं – देवेंद्र फडणवीस  

News Desk

आषाढी एकादशीच्या दिवशी तीन तास विठ्ठल दर्शन रहाणार बंद

News Desk