HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारबद्दल दादा भुसेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; NCPच्या आमदारांचे वेलमध्ये आंदोलन

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सभागृहात आक्रमक झाले आणि वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.

खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवाराच्या घरची चाकरी करतात असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादा भुसे यांनी आदरणीय शरद पवारसाहेबांचे नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही दिलगिरी व्यक्त करा अशी मागणी केली.

दादा भुसे यांनी वक्तव्य केले ते माध्यमांपर्यत गेले आहे त्यामुळे तुम्ही रुलिंग लवकर द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली. दरम्यान शरद पवारसाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर ते रेकॉर्डवरुन काढण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन  कार्यवाही केली असती तर…

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा सुवर्ण क्षण! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Aprna