HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खळबळ उडवणाऱ्या मुलाखतीचं काय झालं? हवा आली आणि गेली,निलेश राणेंचा टोला …

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथाॅन मुलाखत घेतली.या मुलाखतीचे २ भाग प्रदर्शित झाले असून यामध्ये शरद पवार भाजप नेत्यांवर टिका करताना पाहायला मिळाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आणि महाविकासआघाडीचं शरद पवारांनी तोंडभरून कौतुक केलं.

संजय राऊत आणि  शरद पवारांच्या या मुलाखतीकडे राजकीय वर्तुळासोबतचं जनसामान्यांचंही लक्ष लागलेलं होतं. ही मुलाखत प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे टीझर संजय  राऊत यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले होते यावेळी ‘एक शरद ,सगळे गारद’ अशा मथळ्याखाली या मुलाखतीचं वर्णन त्यांनी केलं होतं.मात्र आता ही मुलाखत प्रदर्शित झाल्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी यावर सडकून टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘ एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती झाली का मुलाखत ती???? कुठे काही उडलेल दिसलं नाही. हवा आली गेली तुझं माझं काय घेऊन गेली.

Related posts

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्या बाबत सस्पेंन्स कायम 

News Desk

धनंजय मुंडे यांचा एक दिवसीय शहापूर तालुक्याचा दुष्काळी दौरा

News Desk

गणपती बाप्पा ‘ईडी’चे विघ्न नक्कीच दूर करेल !

News Desk