HW News Marathi
महाराष्ट्र

‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई | भाजप आणि शिवसेनेचे वाद आता शिगेला पोहोचले आहेत. एकमेकांवर जहरी टीकाकारण होत आहे. महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना. बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना आहे, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलं आहे. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.

संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते

नितेश राणेंनी संजय राऊतांवर जहरी टाके केली आहे. नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.

संजय राऊत हे शरद पवार यांचं काम करतात

लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती ते पाहावं. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो की त्यांनी काय म्हटलं होतं. संजय राऊतांनी जेवढ्यास तेवढं राहावं नाहीतर कुंडली काढू, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय. शिवसेनेबद्दल आकस नाही. समोरुन टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवार यांचं काम करतात. त्यांना शिवसेनेशी काही देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप वर जोरदार टीका केली आहे. “भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.”

“शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.”

शिवसेना भवन फोडू

भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहिममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहिम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या हस्ते दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Aprna

२५ ते २७ नोव्हेंबर विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन बंद राहणार

News Desk

मराठा आरक्षणाच्या विषयात शरद पवारांनी का लक्ष दिले नाही? विनायक मेटेंचा सवाल

News Desk