कोल्हापूर | ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्ष नेते राहणार नाहीत’, असे वक्तव्य नुकतेच संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्यावर ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा’, असे खोचक प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. ‘आमचे सरकार व्यवस्थित चालू आहे. आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सीएए, एनआरसी बद्दल भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे मी त्यावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही’. असेही जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीत धुसफुस होत आहे अशा अफवेवर उत्तर दिले. तसेच, ‘भैय्याजींच्या बोलण्याचा अर्थ हा होतो की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत. याचा मला आनंदच आहे आणि दिल्लीत जाऊन ते चांगले काम करतील त्यांना माझ्या शुभेच्छा’, असेही पाटलांनी म्हटले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्यावतीने कोल्हापुरात दोन दिवसीय ब्राह्मण अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाला सुरुवात झाली. शहरातील दसरा चौका मैदानात हे अधिवेशन भरवण्यात आलं आहे. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असून, परिषदेच्या वेबसाईटचे उद्घाटनदेखील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान आज सकाळी शोभा यात्रेने या अधिवेशनाला प्रारंभ झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.