मुंबई | तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. त्यांचे जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जो बायडन यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. “अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय आहे. अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे,” असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे. हे ट्विट करताना त्यांनी बिहार निवडणुकांवरुन भाजपलाही टोला लगावला आहे.
“बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतं. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा,” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष @JoeBiden यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे. https://t.co/2aguTOya2Q
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2020
“जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे,” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.