HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात Corona Vaccinationसाठी ‘केरळ पॅटर्न’ वापरा, शिवसेना नेत्याचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरीही कोरोना लसीककण मोठ्या प्रमाणासह सुरु आहे. यावरच शिवसेना नेत्याने मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिला आहे. राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे.

केंद्र सरकारकडून केरळला 73लाख 26 हजार 806 लस प्राप्त झाल्या. मात्र, त्यामधून 74 लाख 26 हजार 164 लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे 88 हजार जास्त लोकांना लस देण्यात केरळ सरकारला यश मिळाले आहे. लसीची थोडी मात्रा फुकट जाऊ न दिल्यामुळे केरळला ही गोष्ट साध्य झाल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यासाठी लसीकरण केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले. लसीच्या एका कुपीतून 10 लोकांना लस देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात केली जात नसे. 0.5 ml त्याप्रमाणात डोस कमी न करता ही लस दिली. त्यासाठी Auto disposable syringe वापरण्यात आल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

असाच प्रोटोकॉल महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात लसीकरण पुरवठयावरना होणाऱ्या वादावर तोडगा निघू शकतो असा विश्वास माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्युटमध्ये दाखल

News Desk

नाशिक, नांदेड, परभणीत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk

मनमोहन सिंगांनंतर माजी पंतप्रधान देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले ‘हे’ सल्ले

News Desk