HW News Marathi
महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय मदतीतही महाराष्ट्राला मोदी सरकारने डावलले!, कॉंग्रेस म्हणतं या ‘महाराष्ट्र द्वेषाचं’ फडणवीसांनी उत्तर द्यावं

मुंबई | नरेंद्र मोदी सरकार कोरोनाच्या संकटात मदत करतानाही महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोनाकाळात ४० देशांनी केलेल्या मदत वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्राला डावलले आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले आणि वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र वगळून भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा , बिहार व अन्य राज्यांना मदत दिली जात आहे . केंद्र सरकारच्या या कृतीचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून राज्यातील भाजपा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, जवळपास २५ विमानांनी अनेक देशांतून देशाला मदत आली आहे. या देशांमधील अनेक भारतीय वंशाच्या लोकांना भारतातील आपापल्या राज्यांना मदत करावयाची असेल. आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे पीएम केअर फंडाप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारेही आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे. सुरुवातीला कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुतवण्यात भेदभाव केला, त्यानंतर रेमडेसीवीर, ऑक्सीजन तसे लस पुरवठा करण्यातही दुजाभाव केला जात आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्र सरकारव अन्याय केला जात आहे, असेही सावंत म्हणाले.

देश कोरोनाच्या महामारीशी लढत असताना नरेंद्र मोदी सरकार प्रभावी उपाययोजनांना प्राधान्य देण्याऐवजी २० हजार कोटींच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला प्राधान्य देत असल्यावरून जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. मोदी सरकारचा प्राधान्यक्रम चुकत असल्याचे स्पष्ट दिसत असताना शहेनशहा मोदींचा चेहरा वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते बेफाम आरोप करत आहेत. मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बाधणी टेंडर वरील टिका ही हास्यास्पद असल्याचा टोला काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

मनोरा निवासस्थानावरही भातखळकरांना दिले प्रत्युत्तर

‘मनोरा’ दुरुस्त करता आला असता परंतु फडणवीस सरकारच्या काळात त्यातही घोटाळा झाला. म्हणून शहेनशहाला वाचवण्यासाठी व भाजपा आमदारांना दरमहा मिळणाऱ्या पैशांसाठी आरोप करु नका असे सावंत यांनी भाजपाला बजावले. मविआ सरकारला कोरोनाबाबतीत किमान भाजपाकडून उपदेशाची आवश्यकता नाही. आम्ही कोरोनाच्या संकटात कार्यक्षमतेने काम करत आहोत. कोरोना हाताळण्यापेक्षा निवडणुकीत मग्न राहणाऱ्या आणि जनतेला व राज्यांना मदत करण्याऐवजी सेंट्रल व्हिस्टात स्वतःसाठी आलीशान महाल उभारणाऱ्या मोदीजींना या उपदेशाची गरज आहे असेही सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीत काडी टाकू नका; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

Aprna

जळगावात खडसे-फडणवीसांची भेट, चर्चादरम्यान महाजन उपस्थित

News Desk

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

News Desk