HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार राजकारणातले भीष्म पितामह!

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काल(२७ जुलै) त्यांनी संवाद साधला होता. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज(२८ जुलै) ममता बॅनर्जी भेटणार अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील त्या घेणार आहेत. या भेटीचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारण देखील आता पडू लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

पवार राजकारणातले पितामह

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीवरून आपलं मत स्पष्ट केलं आहे. ‘पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे,’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सोनिया गांधीना भेटत आहेत हे चांगलं लक्षण

शिवसेनेचे संजय राऊत हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. “ममता बॅनर्जी या शरद पवारांची भेट घेणार आहेत. भेटीगाठी व्हायला हव्यात कारण यातून विरोधी पक्षाच्या ऐक्यावर एकमत होऊ शकेल का यावर चर्चा करणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी सोनिया गांधीना भेटत आहेत हे चांगलं लक्षण आहे. विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकांन एकमेकांना भेटलं पाहिजे. एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे,” असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बॅनर्जी आणि मोदींची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान निवासमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून सोमावारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मंगळवार सकाळपासूनच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय मंडळींसोबत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर, काँग्रेस नेते कमलनाथ यांची भेट आणि चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर-गाणगापूर एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक नेत्याने चक्क कार्यकर्त्याच्या शेतात केली ऊस लावण!

News Desk

चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत

Manasi Devkar