HW News Marathi
महाराष्ट्र

“औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी…” – संजय राऊत

मुंबई | असदुद्दिन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असून या युतीवरुन सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे यावरून भाजप शिवसेनेवर टीका करत आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला दिलेल्या ऑफर्स संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएमच्या युतीच्या ऑफरवर संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू घेत म्हटलं आहे की, महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, त्यात चौथ्याचा प्रवेश होणार नाही. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवी समीकरणे चर्चेत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला युती करण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही राजकीय पक्ष भिन्न विचारसरणीचे आहेत. दरम्यान, या युती संदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी शिवसेनेची युती होईल याची कल्पनाही कशी करता येईल. भाजप आणि एमआयएममध्ये छुपी युती झाली आहे. तुम्ही ते उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये पाहिलं असेल. त्यामुळे आधीच भारतीय जनता पक्षासोबत कार्यरत असलेल्या त्यांच्याशी महाविकास आघाडीचा संबंध असूच शकत नाही, ती भाजपची बी टीम आहे.

काय आहे प्रकरण ?


इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे माझ्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. त्यावेळी आमच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी आम्ही त्यांना देशातून भाजपचा पराभव करण्यासाठी आमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. मात्र, राजेश टोपे आमच्या प्रस्तावावर काहीही बोलले नाहीत. दरम्यान, आमच्यावर नेहमीच भाजपची बी टीम असल्याची टीका होते. ही टीका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही थेट ऑफर करतो की महाविकास आघाडीसोबत एकत्र करण्यास आम्ही तयार आहोत, असे जलील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक! डॉक्टरची कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

News Desk

मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार; प्रतिलिटर 80 रुपये मोजावे लागणार

Aprna

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादींच्या याचिकेवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk