HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल’’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

जळगाव | शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (१२ जून) ते जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडणूकीत येईल

संयय राऊत म्हणाले की, पती विरोधी पक्षनेता आणि पत्नी महापौर असा योगायोग असलेली जळगाव महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगर पालिका असेल. शिवसैनिकांनो सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका, जोरात काम केलं तर जळगावमध्ये आपला खासदार निवडून येईल. गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी घेतली की ते पार पाडतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी यावेळी गुलाबराब पाटील यांचेही कौतुक केले आहे.

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावानेच आपण पुढे जात आहोत

संजय राऊत यावेळी म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले, हे आता महत्त्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेखा जरे हत्या प्रकरण : मुख्य सूत्रधार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबादमध्ये ठोकल्या बेड्या

News Desk

MPSC विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता गृहमंत्र्याकडे मागणी करणार!

News Desk

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? सेना- काँग्रेसमध्ये नामंतरावरून वाद 

News Desk