HW News Marathi
महाराष्ट्र

भास्कर जाधवांच्या विडिओ वर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(२५ जुलै) चिपळूण दौरा केला. दरम्यान दुकानदारांशी बोलताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या अरेरावीचा विडिओ समोर आला आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणात मात्र संयमी प्रतिक्रिया दिली. “भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय बोले भास्कर जाधव?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल(२५ जुलै) चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी करत असताना एक महिलेने त्यांच्या पुढ्यात तिची व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत करायला हवी

राज्यात पुरामुळे अनेकांचे प्राण गेले असून घरं उध्वस्त झाली आहेत. महाराष्ट्र सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावे. महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल. सरकार आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

कोकणातले लोक तुम्हांला तुमची जागा दाखवणार

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी गाजवले. पुन्हा एकदा राज्यातील पुरग्रस्त परिस्थितीमुळे शिवसेना आमदार भास्कर जाधव हे चांगलेच चर्चेत आले आहेत ते त्यांच्या उद्दामपणामुळे. मदत पूरग्रस्त भागात मदतीची याचना करणाऱ्या महिलेशी त्यांनी उद्दामपणे केलेली वागणूक आणि त्यासंदर्भातला व्हीडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यावेळी एक महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या महिलेला दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर टीका होते आहे. आता मनसे्च्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही भास्कर जाधव यांच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

6 मे ला नांदेडमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण

News Desk

‘दोन शिवसैनिकांची भेट’, भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले…..

Jui Jadhav

अखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

News Desk