HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत, राऊतांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया 

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. यावरुन राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

आज (१४ जानेवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही राऊत यांनी म्हटले.

धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच सोडावे, असे राऊत यांनी म्हटले. यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची आठवण करुन दिली होती. तेव्हादेखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे एका क्षणात चिखलफेक करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक आहे. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तपासावेळी सारखं पोलीसांना फोन केला की राजकीय हस्तक्षेप वाटतो म्हणुन…”!

News Desk

“भाजपने आपले बिअर व वाईनरीचे कारखाने बंद करून पॅकबंद पाणी विकावे”

News Desk

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar