HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे आणि शिवसेनेतील संबंधांवर संजय राऊत म्हणाले….! 

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने काहीच दिवसांपूर्वी मुंबईत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी तपासानंतर ही गाडी चोरीची असून या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन हे असल्याचे समोर आले. दरम्यान, आता या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा दुवा असणारे मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी (५ मार्च) मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे, यावेळी फडणवीसांनी सचिन वाझे यांच्या शिवसेनेची देखील संबंध जोडला आहे. यावर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेत जोडल्या जाणाऱ्या संबंधांवर बोलताना म्हटले आहे की, “मला तसं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. म्हणूनच शिवसेनेवर हा संशय निर्माण केला जात आहे. दरम्यान, भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील या मुद्द्यावरुन शिवसेनेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

‘मनसे’ने देखील उपस्थित केली शंका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट करून ठाकरे सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. “सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?”, असे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी धक्का

News Desk

विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे, झेपेल तर पुढे जा!

News Desk

भीमा-कोरेगाव आयोगासमोर शरद पवार साक्ष नोंदवणार

swarit