HW News Marathi
देश / विदेश

‘खेलरत्न पुरस्कारचं नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ’, संजय राऊतांची मोदींवर टीका

मुंबई। राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचं नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार केलं आहे. यावरून आता चांगलंच राजकारण पेटलेलं पाहायला मिळतंय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल, असा हल्ला चढवत राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे, अशी खंत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

अनेकांची मने दुखावली

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे नाव बदलल्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत, असं देखील राऊतांचं म्हणं आहे. सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरव्ही ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना निरज चोप्रा याने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत.

राजीव गांधी पुरस्कार नको असेकोणीही म्हटलेलं नाही

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार हा फार मनाचा पुरस्कार मानला जातो. 1991-92 सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला, पण राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघास ब्राँझ पदक मिळताच मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे.

कोण आहेत मेजर ध्यानचंद?

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी ३९ गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात १९९१-९२ मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये १९२८ अमस्टर्डम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

मागणी गेल्या काही वर्षांपासून

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव बदल्याचं ट्विट करत माहिती दिली आहे. भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

चिंताजनक ! मुंबईतील तब्बल ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

आज जाहीर होणार टीम इंडियाचा कोच

News Desk