HW News Marathi
महाराष्ट्र

“नारायण राणे कुठेही गेले तरी, लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार”

अहमदनगर | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद अजूनच वाढलेले दिसले आहे. नारायण राणेंनी चिपळूण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी केला होता. तसेच, अनेक मुद्द्यांवरून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करताना दिसत आहे. शिवसेनेकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावत, ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिक म्हणूनच राहणार असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड फोटोग्राफर आहेत. ते वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात. इतर प्राण्यांचे नाही, असा चिमटा काढत दिल्लीच्या‌ तख्तावरही भगवा फडकवू. हरलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तीच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

सत्ता हा मानसिक आधार असतो

शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असे सांगत, पंतप्रधान मोदी म्हणतात, कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. सत्ता हा मानसिक आधार असतो. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठवू का असा दम देऊ शकतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. तसेच गुजरातेतदेखील सामना पेपर घेतात, असे राऊत यांनी नमूद केले. नगर येथे आज (३१ जुलै) एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.

लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार

संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असे म्हटले जात नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते. तुम्ही कुठेही जा, लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश

News Desk

Teachers Day | शिक्षक दिनी ज्ञानदाते रस्त्यावर

News Desk

नितीन राऊत यांचे उर्जामंत्रीपद जाणार? कॉंग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याच्या चर्चा

News Desk