HW News Marathi
महाराष्ट्र

‘संजय राऊत म्हणजे आजचे आचार्य अत्रे’ भुजबळांकडून राऊतांचं कौतुक

नाशिक | शिवसेना खासदार संजय राऊत म्हणजे आजचे आचार्य अत्रे आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांचं कौतुक केलं आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला संजय राऊत आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते.त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते.

नाशिकमधील या कार्यक्रमात भुजबळ म्हणाले की ,शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार, असं संजय राऊत अगदी पहिल्यापासून सांगत होते. ते आजचे आचार्य अत्रे आहेत.आपली लढाई फार मोठी होती पण ती आपण जिंकलो, राऊतांनी अत्रेंसारखा निश्चय पुर्ण केला. मंत्री झालो त्यानंतरचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे. अध्यक्ष म्हणून राऊत यांच्या माध्यमातून चांगली व्यक्ती मिळाली, असं सांगायलाही छगन भुजबळ विसरले नाहीत.

आज छगन भुजबळ यांनी राऊतांचं तोंडभरून कौतुक केलं असलं तरी ,लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करून आलेल्या श्रद्धेय, पूजनीय अशा ‘आसाराम बापू’ अन् त्यांच्या कंपूची उर्फ भुजबळ कुटुंबीयांची नाशिककर जबाबदारी घेणार का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता.

त्यामुळे आता संजय राऊत भुजबळांना ‘आसाराम बापु’ म्हणाले होते तर छगन भुजबळ राऊतांना ‘आचार्य अत्रे’म्हणतायत. ऱाजकारणात काहीही अशक्य नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना ही बिल गेट्सची कल्पना” बंडातात्या कराडकरांचे अजब वक्तव्य

News Desk

सुनिल पाटीलला आयुष्यात भेटलो नाही, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाहीच – नवाब मलिक

News Desk

व्हिसा उल्लंघन प्रकरणी १५६ परदेशी नागरिकांवर गुन्हे

News Desk