HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया पुर्ण, प्रकृती स्थिर

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर एण्डोस्कोपी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच ते रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

काल (३० मार्च) संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्आच दिवशी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

काय म्हणाले डॉक्टर ?

शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही उद्या शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. त्यांच्या पित्तनलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढून. यामुळे पवार यांच्या लिव्हरवरचा दाब कमी होणार आहे. त्यांना झालेला कावीळसुद्धा कमी होईल. तसेच pancreatitis सुद्धा कमी होईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया

दरम्यान, शरद पवार यांच्या पित्ताशयात अजूनही काही स्टोन शिल्लक आहेत. त्यावर कधी शस्त्रक्रिया करायची हे नंतर ठरवले जाणार आहे. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत शरद पवारांवर शस्त्रक्रिया पुर्ण झाल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांची प्रकृती ठिक असून ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

News Desk

सारथी संस्था बंद करण्याचे षडयंत्र !

swarit

ड्रग्स रॅकेट उघड करणे हा माझा गुन्हा ठरला – कंगना राणावत

News Desk