HW News Marathi
महाराष्ट्र

राऊत- फडणवीस यांच्या भेटीला राजकीय अर्थ नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

पंढरपूर | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२९ सप्टेंबर) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली तर प्रसंगी टोलाही लगावला आहे. नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट सामनात होणाऱ्या त्यांच्या मुलाखतीबद्दल होती असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“खासदार संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही असे त्यांनी म्हटले आहे. काहीही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार”, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामूळे राऊत फडणवीस यांच्या भेटीबाबत शरद पवारांनी त्यांच्याबाजून पुर्णविराम लावला आहे.

तसेच, देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवन्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा! -बाळासाहेब थोरात

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता राज ठाकरे मैदानात; राज्य सरकारशी चर्चा करणार

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

News Desk