HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता शरद पवारांच्या दरबारी जाणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन केले. तसेच आता त्यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. यासाठी आम्ही लवकरच शरद पवार यांची भेट घेण्यात असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी सांगितले आहे. टीव्ही ९ मराठीशी ते बोलत होते.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे. त्यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यापूर्वीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. मात्र, तुर्तास शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात मोजके आणि सावधपणाने बोलण्यावर भर देत आहेत. मात्र, आता मराठा क्रांती मोर्चाचे थेट त्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे मार्गदर्शकअसलेले शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेणार आणि हा प्रश्न सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी चालक संतोष मानेची फाशी रद्द, आता सुनावली जन्मठेपेची शिक्षा

News Desk

मेधा पाटकर, राजू शेट्टी माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या भेटीला!

News Desk

शरद पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पुण्यात उद्या आंदोलन

News Desk