HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे हे सूर्ययान मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर सुरक्षित उतरेल !

मुंबई | “काही दिवसांपूर्वी आमचे चांद्रयान – २ तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावर उतरु शकले नाही. पण, शिवसेनेचे हे सूर्ययान २१ ऑक्टोबरनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही,” आदित्य ठाकरेंचे तोंडभरुन कौतुक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत पुढे असे देखील म्हणाले की, आदित्या ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा ऐतिहासिक दिवस ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत.

दरम्यान, आज महाराष्ट्राचा छावा राजकारणात आला आहे. जेव्हा शिवाजी महाराजाचा छावा राजकारणात आला, तेव्हा महाराष्ट्राचे आणि देशाचे बदलून गेले. आजपासून राज्याचे राजकारण पुन्हा ‘मातोश्री’भोवती फिरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आज (३० सप्टेंबर) या संदर्भात औपचारिक घोषणा केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते पहिलेच ‘ठाकरे’ आहेत.

होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार

“होय, मी विधानसभा निवडणूक लढविणार,” घोषणा शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वरळीतील विजय संकल्प मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी स्वत: वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. “हीच ती वेळी आहे. लोकांच्या न्याय हक्काच्या न्यायची लढण्याची, हीच तीवेळी, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र करण्याची, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्याची, हीच ती वेळी महाराष्ट्रला सुजलाम सुफलाम करण्याची, कर्ज मुक्त महाराष्ट्र बनव्याची, तुम्ही माझ्यासोबत आहेत की, नाही असे म्हणत आदित्य ठाकरेंना उपस्थितींमध्ये ऊर्जा निर्माण केला. आदित्य ठाकरेंनी पुढे म्हणाले की, लढायला तयार आहात का?, जिंकायला तायरा आहात का?, अशा घोषणा देऊन त्यांनी वरळीतील मदारसंघात शिवसेनेची दाकत दाखविली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

Aprna

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

छगन भुजबळांच्या शिवसेनाप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम ?

News Desk