HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू! – संजय राऊत

मुंबई | देशाचे आणि राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजुंनी काम होणे हे लोकशाहीमध्ये महत्वाचे असते. परंतु, दुर्दैवाने गेल्या सात-आठ वर्षात हे चित्र बदलल्याले पाहायला मिळते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत, अशी चिंता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. राऊत हे  दिल्ली असून ते आज (१४ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. या भेटी दोघांमध्ये नेमके कोणत्या राज्यांच्या कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

राऊत म्हणाले, “देशाचे आणि राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजुंनी काम होणे हे लोकशाहीमध्ये महत्वाचे असते. परंतु, दुर्दैवाने गेल्या सात-आठ वर्षात हे चित्र बदलल्याले पाहायला मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत. एकमेकांचे पराकोटीचे वैरी आहेत, महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात. आणि हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी हे चांगले नाही,” असे ते म्हटले. 

“एकदा निवडणुका झाल्या की, विकासावर बोलण्यास सुरुवात होते. पाच वर्षांनी निवडणुका आल्यावर पुन्हा जुन्या मुद्द्यांवर येतो. यामुळे आता लोकांनाही यांची सवय झाली आहे. गंगेत प्रेते वाहून गेली. तशी लोकेही वाहू जाताना दिसत आहेत. हे चित्र देशासाठी चांगलेन नाही. देशातील पाचपैकी चार राज्यात भाजप आणि एक राज्यात आपची सरकार आली. विजयाचे अजीर्ण होऊ नये, ते सत्कारणी लावावा. आपल्या देशात विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज आहे,” असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.   

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौर पेंग्वीन पाहाण्यासाठी गुजरातला गेल्या, पण…; चित्र वाघांचा टोला

Aprna

अजित पवार ,शरद पवार,धनंयज मुंडे यांनी संजय राऊत  यांची घेतली खासमखास भेट !

News Desk

डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार दूरसंचार पायाभूत सुविधा निर्मिती धोरणास मान्यता

News Desk