HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली, संजय राऊतांनी दिली माहिती!

मुंबई। शिवसैनिकाचे लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली असून, यंदाचा दसरा मेळावा हा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच होणार आहे.गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावापार पडणार आहे. यंदाचा दसरा मेळावा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदाचा दसरा मेळावा मांटुग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडेल.

सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल

संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दसरा मेळाव्यात ही माहिती दिली आहे. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षी ऑनलाईन दसरा मेळावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गेल्यावर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेणार अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार

संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दसरा मेळाव्यात ही माहिती दिली आहे. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

राऊत काय म्हणाले होते?

कोरोनाचं संकट जरासे ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदगावच्या सेना आमदाराची भुजबळांशी खडाजंगी, त्यानंतर शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा!

News Desk

मुख्यमंत्र्यांवरची शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांची माहिती

News Desk

एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, उदय सामंतांची घोषणा!

News Desk