HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच ! । निलेश राणे

मुंबई । “अजित पवार हे स्वत:च्या कर्तृत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडून आणू शकत नाहीत याची आम्हाला खात्री आहे”, अशी बोचरी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे हे यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. दरम्यान, राज्याच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपविरोधातील आक्रमकता प्रकर्षाने अधिक दिसली. त्यामुळे आता भाजपकडूनही थेट अजित पवारांवर बोचऱ्या टीका होताना दिसत आहेत.
निलेश राणे यांनी यापुढे अजित पवारांवर निशाणा साधताना असेही म्हटले आहे की, “अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच. त्यामुळे त्यांनी त्यावर स्वत:चं लेबल लावू नये.” पुढे निलेश राणे असेही म्हणाले की, “लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात. पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात.”
दरम्यान, “अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी दिसत नाही. त्यामुळे उगाच त्यांनी मोठ्या गोष्टी करू नयेत”, असाही खोचक सल्ला यावेळी निलेश राणेंनी दिला आहे. अजित पवार यांच्या वाढलेल्या आक्रमकतेमुळे या काही दिवसांत अजित पवार विरुद्ध भाजप अशी जुंपताना दिसत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा

News Desk

Dhangar Reservation । सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्या होणार युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

News Desk