HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांना विचारा, सुप्रिया सुळेंची खडसेंच्या प्रवेशावर प्रतिक्रिया

पुणे | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का? यावरुन राजकीय वर्तृळात चर्चा सुरु आहेत. खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरुच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई – खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवले आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं. नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याची चर्चा आहे. तसेच, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खडसेंबद्दल बोलताना सांगितलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुकसानीचे पंचनामे करा: पालकमंत्री एकनाथ शिंदे

News Desk

ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा.. मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा, नितेश राणेंचे सुचक ट्विट

News Desk

शिवस्वराज्य यात्रा संपली कि राष्ट्रवादी देखील संपेल !

News Desk