HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यातील रक्त पुरवठा वाढविण्यासाठी मी स्वतः रक्तदान करणार”,सुप्रिया सुळेंचा निर्णय

मुंबई | एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा महत्त्वाचा घटक असतो. कोरोनाकाळात मागच्या आठ महिन्यात राज्यात होणारे रक्तदान मंदावले. अपुऱ्या रक्त पुरवठ्यामुळे आरोग्य क्षेत्राला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यात असलेल्या सुमारे ३४४ रक्त पेढ्यात अवघे काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उरला आहे. रुग्णालयांना रक्ताचा मोठा तुटवडा भासत असल्याचे लक्षात आल्यामुळे मी स्वतः रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे देखील सामाजिक भावनेतून रक्तदान करणार आहेत. आज (१० डिसेंबर) दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे रक्तदान करण्यात येणार आहे.

कोरोना काळातील निर्बंधामुळे महाविद्यालये बंद आहेत. अनेक आस्थापनांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे रक्तसंकलनात मोठीच अडचण निर्माण झाली. रक्तपेढ्यांना रक्तपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या पातळीवर निर्धाराने पेलण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाशल्य चिकित्सक आणि संबंधित रक्तपेढ्यांना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जी वसुली केली त्याची परमबीर सिंग यांनी कबुली द्यावी, राष्ट्रवादीची मागणी  

News Desk

वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

News Desk