मुंबई | “शिवसेनाच ठरविणार देशाचा पुढील पंतप्रधान असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.” शिवसेनेचे खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज (५ फेब्रुवारी) मातोश्रीवर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असणार आहे. शिवसेना ही स्वबळावर लोकसभा निवडणुका लढविणार असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असणार असे पुन्हा एकादा राऊत म्हणाले.”
Sanjay Raut, Shiv Sena on JDU leader and strategist Prashant Kishore: He is a leader of one of NDA's allies and he met Uddhav ji in that regard. See it as a courtesy visit and not a political visit. pic.twitter.com/ofNTIOEchO
— ANI (@ANI) February 5, 2019
तसेच अण्णा हजारे यांना जावून भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे ताकद उभी करणे हे जास्त महत्त्वाचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राऊतांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे सतत अण्णांच्या संपर्कात असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांना सांगितले. सरकार अण्णांच्या जिवाशी खेळत आहेत. अण्णांचे आंदोलन अण्णांसोबत संपावे अशी सरकारची इच्छा आहे. परंतु आम्ही असे होऊ देणार नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.