HW Marathi
राजकारण

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार !

मुंबई | युतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तसेच महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार असल्याचे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देशात अनेक अदृश्य हात राजकारण करतात आहे, असे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. तसेच पुढे राऊत असे देखील म्हणाले की, भाजपकडून कुठलाच प्रस्ताव आणि कागद घेऊन कुठलाही नेता आमच्याकडे आलेला नाही.

शिवसेनेच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज (२८ जानेवारी)  बैठक होती. ही बैठक संपल्यानंतर राऊत यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना सांगितले. ही बैठक मातोश्रीवर घेण्यात आली असून देशातील ज्या नागरिकांचे ८ लाखांपर्यंत उत्पन्न आहे. अशा नागरिकांचे आयकर रद्द करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सवर्ण आरक्षणानुसार जे १० टक्के आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे ८ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या गरीब मानन्यात आले आहे. त्यामुळे ८ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यातव्या अशी मागणी केली आहे.

Related posts

माझा पत्ता राज्यातील नेत्यांनीच कट केला, खडसेंचा महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर टीका

News Desk

नवाब मलिक यांची बैल गाडीवरुन आक्रोश रॅली

धनंजय दळवी

…म्हणून प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आली ३ वेळा शपथ घेण्याची वेळ

News Desk