मुंबई | “महाराष्ट्रात सध्या २ मुख्यमंत्री आहे. एक ‘मातोश्री’वर बसून काम करत आहेत. तर दुसरे राज्यभर फिरत आहे”, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “कोंबडं झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. उद्धव ठाकरेंनी कद्रूपणा सोडावा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावं”, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी अजित पवारांबद्दलही चंद्रकांत पाटलांनीमोठे विधान केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
“केवळ विश्वास देण्यासाठीच उद्धव ठाकरे सरकार पडणार नाही असे वारंवार सांगत आहेत. हे तिघेही सारखे भांडतात. नंतर परत काही झालच नाही असं सांगतात”, अशीही टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. त्याचप्रमाणे, उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल बोलतानाही चंद्रकांत पाटलांनी मोठे विधान केले आहे. “महाविकासआघाडीमध्ये सध्या अजित पवार कसे अपयशी ठरत आहेत, हे दाखवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आता हे प्रयत्न कोण करत आहेत ते तुम्हीच बघा”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला आता महाविकासआघाडीकडून काय प्रत्युत्तर येणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.