HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे साडेतीन लोकं कोठडीत जातील, उद्या पर्दाफाश करणार; राऊतांचा इशारा

मुंबई | शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे उद्या (१५ फेब्रुवारी) मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राऊत मोठा गौप्यस्फोट करणार असं दिसून येतंय. कारण आपण भाजपचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार असल्याचं सांगितलं. तर देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक कोठडीत असतील, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

संजय राऊतांनी आज भाजपवर चौफेर टीका केली आहे. तर उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत मी तर असणारच पण पूर्ण पक्ष उद्या उपस्थित असेल, असे त्यांनी सांगितले. पक्षातील मंत्री, आमदार व खासदार सर्वच असतील आणि आम्हाला संपूर्ण देश उद्या ऐकेल. तसेच उद्या पहा काय होतंय ते, मी आता काही सांगणार नाही. आम्ही खूप सहन केलं आहे. आता बर्बाद पण आम्हीच करणार”, असं म्हणत त्यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

 ‘साडेतीन लोकं’ अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील

राऊत म्हणाले, “शिवसेना आणि ठाकरे परिवारावर आणि आमच्या सर्वांवर जो काही चिखल उडवला जात आहे, त्या सगळ्याला उद्या आम्ही उत्तर देऊ. जे सतत सांगतात हा मंत्री जेलमध्ये जाणार, तो मंत्री जेलमध्ये जाणार. पण येत्या काही दिवसांमध्ये भाजपचेच ‘साडेतीन लोकं’ अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील”, असं म्हणत राऊतांनी या विधानावर जोर दिला. तसेच हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातही सरकार आहे, तेही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे लक्षात ठेवा, असंही राऊतांनी म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन

News Desk

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk

मला कुणी शिकवण्याची गरज नाही, फडणवीस बोलले तरच उत्तर देईन!

News Desk